22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रफडणवीसांचे निर्णय निवडणुकीत ‘गेमचेंजर’ ठरतील?

फडणवीसांचे निर्णय निवडणुकीत ‘गेमचेंजर’ ठरतील?

लातूर : निवडणूक डेस्क
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमधील जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून मतदारांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली जात आहेत.

त्यावरून वेगवेगळे दावे-प्रतिदावेही केले जात आहेत. दरम्यान, या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेसह देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून मागच्या अडीच वर्षांत तसेच मुख्यमंत्रिपदाच्या काळात घेतलेले निर्णय परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे.

अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास
देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या काळात २०२३ मध्ये वित्तमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करताना एसटी बसमध्ये महिलांसाठी अर्ध्या तिकिटात प्रवासाची सुविधा देण्याची घोषणा केली होती. या योजनेचा लाभ महिलांकडून मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. तसेच प्रवासी संख्या वाढल्याने एसटी महामंडळालाही त्याचा फायदा होत आहे.

शेतक-यांना १ रुपयात पिकविमा
महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वित्तमंत्रालयाचा कार्यभार सांभाळताना २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात शेतक-यांना फक्त १ रुपया भरून पीक विमा योजना लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २०२३-२४ पासून ही योजना महाराष्ट्रात लागू झाली होती. या योजनेचा लाभही लाखो शेतक-यांना मिळत आहे.

मुंबईतील मेट्रो प्रकल्प
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा मुंबईमध्ये केवळ एकच मेट्रो प्रकल्प होता. मात्र त्यानंतरच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन मुंबईमध्ये मेट्रो मार्गाचे जाळे विणण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली. त्यामधून आता मुंबईतील विविध मार्गावरील मेट्रो पूर्णत्वास जात आहेत. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीवरील ताण कमी होत आहे.

रस्ते, महामार्गांबाबतचे धोरण
राज्याच्या आर्थिक विकासासाठी दळणवळणाची अद्ययावत साधने उपलब्ध असणे आवश्यक असते. या विचारामधून देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गासह अनेक रस्त्यांच्या बांधणीवर विशेष लक्ष दिले. मुंबईतही कोस्टल रोड, अटल सेतू यांसारख्ये मार्ग फडणवीस यांच्या काळात त्यांच्याच पुढाकाराने पूर्णत्वास गेले आहेत.

जलयुक्त शिवार आणि अन्य योजना
चांगल्या शेतीसाठी पाण्याची सर्वाधिक आवश्यकता असते, या विचारामधून देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. तसेच मागेल त्याला शेततळे योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना शेततळ्यांसाठी आर्थिक मदत केली जाते. याबरोबरच शेतक-यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप ही योजनाही देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR