22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाराजकारणात येणार नाही: युवराज सिंग

राजकारणात येणार नाही: युवराज सिंग

नवी दिल्ली : भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याची आई शबनम सिंग यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच भेट घेतली होती.या भेटीनंतर युवराज गुरुदासपूरमधून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.मात्र, या चर्चेला पुर्नविराम देत युवराजने मी राजकारनात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले. ४२ वर्षीय युवराजने सांगितले की, लोकांना मदत करणे ही त्याची आवड आहे. माझ्या ‘यूवीकैन’फाऊंडेशनच्या माध्यमातून मी ती करत आहे, असे युवराज म्हणाला.

एकीकडे त्याचा सहकारी आणि दिल्ली पूर्व लोकसभा मतदार संघाचा भाजप खासदार गौतम गंभीर याने राजकारणातून बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे. तर दूसरीकडे युवराज भाजपकडून गुरुदासपूरमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असी चर्चा माध्यमांतून समोर येत होती. यावर युवराजने सोशल मीडिया साईड एक्सवर पोस्ट करून म्हटले की, माध्यमातून मी राजकारणात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तो खोटा असून राजकारणात येण्याची माझी कोणतीच इच्छा नाही, असे सुवराज म्हणाला.

२०११ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर युवराजने अमेरिकेत जाऊन कॅन्सरवर उपचार घेऊन कॅन्सरवर मात केली होती. यानंतर त्याने एका फाउंडेशन सुरू केले असून तो कॅन्सरग्रस्त लोकांची मदत करतो. माझी विविध क्षेत्रात आवड असून मी लोकांची मदत करत राहीन असे युवराज म्हणाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR