17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeनांदेडविष्णुपुरी बंधाऱ्याचे दरवाजे उघडणार?

विष्णुपुरी बंधाऱ्याचे दरवाजे उघडणार?

नदीपात्रात पाणी वाढल्याने सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा

नांदेड : प्रतिनिधी
नांदेडचा विष्णुपुरी प्रकल्प आता ८३ टक्क्यांनी भरला असून या बंधाऱ्याचे दार कधीही उघडले जाऊ शकते. त्यामुळे नदीपात्रात विसर्ग वाढण्याची शक्यता असून प्रकल्पाच्या पुढील गावांनी सतर्क असावे असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. राज्यात सध्या जोरदार पाऊस पडत असून रात्रभर झालेल्या पावसाने राज्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असणाऱ्या शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प ८३ टक्के क्षमतेने भरला आहे. नदीपात्रात त्यामुळे विसर्ग वाढेल.

बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल, अशी सूचना पूर नियंत्रण अधिकारी यांनी केली आहे. त्यामुळे विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीवित्वाचे, पशुधनाचे,वीटभट्टी साहित्याचे नुकसान होणार नाही,यासाठी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे.

विष्णूपरी भरले ८३ टक्के भरले
नांदेड जिल्हयातील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे आज दि. २५ रोजी ८३% क्षमतेने भरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR