23.3 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeराष्ट्रीयसिद्धरामय्या मुख्यमंत्रिपद सोडणार?

सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपद सोडणार?

बंगळूरू : वृत्तसंस्था
सर्वजण मुख्यमंत्री झाले पण उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मात्र अद्याप संधी मिळालेली नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपद सोडून शिवकुमार यांना संधी द्यावी, असे आवाहन विश्व वक्कलींग महासंस्थान मठाचे श्री चंद्रशेखर स्वामी यांनी केले.

नाडप्रभू केम्पेगौडा हेरिटेज साईट डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी, बीबीएमपी आणि कन्नड आणि संस्कृती विभागातर्फे शहरातील कंठिरवा स्टेडियमवर आयोजित नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या ५१५ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, शिवकुमार हे व्यासपिठावर उपस्थित होते.

चंद्रशेखर स्वामी म्हणाले, ‘सिद्धरामय्या यांनी मन मोठे केल्यास हे शक्य आहे. सिद्धरामय्या यांना पुन्हा एकदा सलाम करतो. कृपया, शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा. सर्वांनी मुख्यमंत्री म्हणून सत्ता उपभोगली आहे. आमचे शिवकुमार झाले नाहीत. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री म्हणून खूप अनुभव आहे. शिवकुमार यांच्यासाठी त्यांनी आता पद सोडावे. पुढील काळात त्यांचे कल्याण होवो. हे केवळ सिद्धरामय्याच करू शकतात.

उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक असे दोन प्रांत निर्माण केले आणि उत्तर कर्नाटकचा सर्वांगीण विकास झाला तर त्या भागातून बंगळूरला होणारे स्थलांतर टाळता येईल, असेही स्वामीजी म्हणाले.

मुख्यमंत्री बदलाचा निर्णय हायकमांडचा!
चंद्रशेखर स्वामींच्या आवाहनानंतर पत्रकारांजवळ प्रतिक्रिया देताना सिध्दरामय्या म्हणाले, ‘मुख्यमंत्री बदलण्याचा अधिकार हा विषय पक्षाच्या हायकमांडवर अवलंबून आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या सूचनेनुसार आम्ही कार्य करतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR