22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी पवार गट ८५ जागांवर लढणार?

राष्ट्रवादी पवार गट ८५ जागांवर लढणार?

पुणे : जागा वाटपात मोठा आकडा पदरात पाडून घेण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पुन्हा एकदा स्ट्राईक रेट वर भर असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन ८५ वर चर्चा झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८५ जागा लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आजच्या आज जागा वाटप सोडवून उमेदवारांना तत्काळ तयारीसाठी वेळ देण्याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना शरद पवारांनी सूचना दिल्या आहेत. पक्षाने पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रामुख्याने जागा घेतल्याची बैठकीत चर्चा झाली आहे. तसेच पक्ष ८५ जागा लढणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. पार्लमेंट्री बोर्डाच्या मीटिंगनंतर आता पक्षाच्या सर्व खासदारांसोबत शरद पवारांची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जबादा-यांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

५८ उमेदवार निश्चित
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ५८ उमेदवार निश्चित झाले आहेत. या ५८ उमेदवारांमध्ये अद्याप अल्पसंख्यांक समुदायाचा एकही उमेदवार नाही. लोकसभेला अल्पसंख्याक समुदायाने महाविकास आघाडीच्या पदरात भरभरून मतदान केल्याने अल्पसंख्याक समुदायाला संधी मिळावी अशी शरद पवार पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. सध्या उमेदवार निश्चित झालेल्या ५८ विधानसभा मतदारसंघात अणुशक्ती नगर विधानसभेचा समावेश नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजूनही पक्षांतर्गत २७ उमेदवार निश्चित होणे बाकी असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR