16.2 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeअंतरराष्ट्रीयमंगळावर ९० दिवसांत पोहचणार?

मंगळावर ९० दिवसांत पोहचणार?

एलन मस्कची योजना तयार

न्यूयॉर्क : स्पेसएक्सचे सीईओ आणि टेस्लाकारचे निर्माते इलॉन मस्क हे नेहमीच त्यांच्या निर्णय आणि इनोव्हेशनने जगाला चकीत करीत असतात. या इलॉन मस्क यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. सध्या मंगळ ग्रहावर अंतराळ यान पाठविण्यास सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. परंतू इलॉन मस्क यांनी हा प्रवास ९० दिवसात होऊ शकतो असे म्हटले आहे. मंगळावर पोहचण्यासाठीचा वेळ कमी करण्यासाठी मस्क अंतराळ यान स्टारशिपला वेगळ्या प्रकारे डिझाईन करीत आहेत.

संपूर्णपणे इंधनाने भरलेले हे अंतराळ यान ३६,००० किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करु शकते असा दावा मस्क यांनी केला आहे. यामुळे पृथ्वी ते मंगळ या दरम्यानचे अंतर ८० ते १०० दिवसात पूर्ण करता येईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे सध्या मंगळावर जायला लागणा-या वेळेच्या तुलनेने हे क्रांतीकारक पाऊल ठरणार आहे.

सध्या अंतराळ यान सर्वसाधारणपणे ३९,००० किमी प्रति तास या वेगाने उडतात. त्यामुळे मंगळ ग्रहावर पोहचण्यास खूप वेळ लागत असतो. परंतू नवे तंत्रज्ञान आणि ऑर्बिटल रिफ्युलिंग आणि अधिक ताकदवान इंजिन या प्रवासाचा वेळ कमी करु शकतात. काही अंदाजानुसार या तंत्रज्ञानाचा वापर करुन स्टारशिप केवळ ४५ ते ९० दिवसात मंगळावर पोहचू शकते. स्पेसएक्सच्या प्रस्तावानुसार या दरम्यान स्टारशिपच्या सोबत इंधन टँकर देखील पाठविण्यात येतील. हे मुख्य अंतराळयानात प्रवासात इंधन भरण्याचे काम देखील करतील. यामुळे यानाचा वेग वाढेलच शिवाय ते अधिक वजन देखील उचलण्यास सक्षम होईल.

९० दिवसात पोहचण्याचे फायदे
मंगळावर वेगाने पोहचण्याचे अनेक फायदे आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अंतराळवीरांना हार्मफुल कॉसमिक रेडीएशनपासून वाचविणे शक्य होईल. लांबच्या प्रवासात रेडिएशनचा धोका असतो. यामुळे आरोग्यावर मोठा परिणाम होतो. तसेच प्रवासाला कमी वेळ लागल्याने मिशनसाठी कमी साहित्य न्यावे लागेल. त्यामुळे अंतराळ यान हलके आणि अधिक कुशल बनेल.

इलॉन मस्क यांचे स्वप्न
इलॉन मस्क यांचे मंगळवर मानवी वस्ती करण्याचे स्वप्न आहे. यामुळे पृथ्वीवर भविष्यात जर काही संकट आले तर मानवाला मंगळावर जाण्याचा दुसरा पर्याय तयार असेल. स्पेसएक्सने अलिकडेच स्टारशिप सुपर हेव्हीचा सहावे उड्डाण यशस्वी केले. आता साल २०२५ मध्ये सातवी चाचणी करणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR