26.8 C
Latur
Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्रविधानपरिषदेच्या घोडेबाजारात वारेमाप खर्च

विधानपरिषदेच्या घोडेबाजारात वारेमाप खर्च

मतांची फुटाफूट टाळण्यासाठी ‘होऊ दे खर्च’ हॉटेलचे भाडे लाखोंच्या घरात

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. ती रोखण्यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी योग्य ती खबरदारी घेण्यास सुरूवात केली असून आपल्या आमदारांच्या बैठका आणि त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी पक्षांनी मोठी तयारी केली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदारांच्या सोईसुविधांवर तगडा खर्च होत असल्याचे चित्र आहे. मतांची फुटाफूट टाळण्यासाठी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार ंिरगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे, मात्र या निवडणुकीत मतांची जुळवाजुळव करताना आपल्या पक्षाचे आमदार फुटू नयेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि काँग्रेस वगळता अन्य पक्षांनी त्यांच्या आमदारांची व्यवस्था येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये केली आहे. यासाठी लाखोंचा खर्च देखील करण्यात येत असल्याचे चित्र आहे. या आमदारांना ठेवलेल्या हॉटेलचे भाडे हे १२ ते २५ हजार रूपये इतकं आहे. हा संपुर्ण खर्च कोण करणार असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

कोणत्या पक्षांचा किती खर्च?
भाजप आमदारांचा मुक्काम हा हॉटेल प्रसिडेंटमध्ये आहे. त्या हॉटेलचे दिवसाचे भाडे हे १५ ते २० हजार रूपये इतके आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा मुक्काम हा ताज लॅण्ड्स एंडमध्ये आहे त्याचे दिवसाचे भाडे हे १५ ते २५ हजार रूपये इतके आहे. तर ठाकरे गटाचे आमदार हे आयटीसी मराठा या हॉटेलमध्ये थांबले आहेत. याचं भाडं हे १२ हजार ते १५ हजार रूपये इतके आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार थांबलेल्या द ललीत हॉटेलचे भाडे देखील दिवसाला १५ हजार ते २० हजार रूपये इतके आहे.

आमदारांची व्यवस्था
शिवसेना : ताज लँड्स एन्ड (वांद्रे)
राष्ट्रवादी काँग्रेस : हॉटल ललित (विमानतळ)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : आयटीसी ग्रँड मराठा (परळ)
भाजप : प्रेसिडेंट हॉटेल (कफ परेड)
विधान परिषदेसाठी उमेदवार
भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके,
अमित गोरखे, सदाभाऊ खोत
शिवसेना (शिंदे गट ): भावना गवळी, कृपाल तुमाने
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे
काँग्रेस : डॉ. प्रज्ञा सातव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : मिंिलद नार्वेकर
शेकाप : जयंत पाटील

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR