22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरमहिला सक्षमीकरण म्हणजे त्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर सुधारणे : संगीता पाटील

महिला सक्षमीकरण म्हणजे त्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर सुधारणे : संगीता पाटील

सोलापूर : मागील काही दिवसापासून महिलांवरील तसेच मुलीं वरील होत असलेल्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता पोलीस दलातर्फे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे व त्याचाच एक भाग म्हणून भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर येथे विजापूर रोड पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. डॉ. एस बी सावंत यांनी पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांचे स्वागत केले व महिलांवरील घडत असलेल्या अत्याचाराच्या घटना या मन सुन्न करणाऱ्या असून त्यासाठी सर्व स्तरातून चिंतन होणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना परत घडणार नाही असे आपले मत विशद केले. पोलिस निरीक्षक संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतेवेळी अजूनही भारतामध्ये स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण हे पुरुषांच्या मानाने कमी असल्याचे सांगितले व यामुळेच स्त्रियांचा आर्थिक व सामाजिक स्थर सुधारला नसल्याचे सांगितले.

हा स्तर जर सुधारायचा असेल तर शिक्षणाविषयी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षेतेसाठी विविध कायदे उपलब्ध आहेत परंतु महिलांमध्ये या कायद्याविषयी जागृती नसल्याचे सांगितले व त्यामुळेच महिला व विद्यार्थिनीवर अत्याचाराचे गुन्हे घडत असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयीन युवतींना मुख्यत्वे करून शाळेत जात असलेल्या मुलींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याविषयीची माहिती करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

स्त्री कोणतीही असो मग ती आपल्या घरातील आई बहीण किंवा आपल्या महाविद्यालयातील मैत्रीण प्रत्येक स्त्रीचा आदर करणे हे पुरुषांचे प्रथम कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून आपली मरगळ झटकून स्त्रियांनी स्वतःला सक्षम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महाविद्यालयात किंवा शाळेमध्ये एखादी चुकीची घटना घडल्यास विद्यार्थिनींनी लगेच आपल्या शिक्षकांना व पालकांना त्याची माहिती करून देणे गरजेचे असल्याने त्यांनी सांगितले जेणेकरून त्याला आळा घालता येईल. प्रमुख पाहुण्यांची ओळख व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी केले तर आभार प्रदर्शन एमबीए विभाग प्रमुख प्रा. सी. आर. सूर्यवंशी यांनी केले. यावेळेस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR