18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीमहिलांनी उद्योग क्षेत्रात कर्तृत्व दाखवावे : डॉ.संप्रीया पाटील

महिलांनी उद्योग क्षेत्रात कर्तृत्व दाखवावे : डॉ.संप्रीया पाटील

परभणी : महिलांनी आता घरी न बसता उद्योग क्षेत्रात आपले कर्तृत्व दाखवून आर्थिक सक्षमता जपून संसाराचा गाडा धैर्याने चालविण्यासाठी महिलांनी आगामी काळात उद्योग क्षेत्रात गती घ्यावी असे प्रतिपादन डॉ. संप्रीया पाटील यांनी केले.

महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. पाटील बोलत होत्या. येथील लोकार्थ सामाजीक संशोधन आणि विकास संस्थेच्या माध्यमातून तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार झालेल्या उदघाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, विद्यादीप फाउंडेशन संस्थापक आणि संशोधीक सल्लागार सातारा येथील डॉ. दिपक ताडपुंडे, सतीश शेंडे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संयोजक संस्थेचे अध्यक्ष विलास देशपांडे तर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून लक्ष्मीकांत क्षीरसागर यांनी आपली भूमीका मांडली. कार्यक्रमाचे संचलन प्रताप देशमुख, प्रास्तावीक विलास देशपांडे तर आभार लक्ष्मीकांत क्षीरसागर यांनी मांडले. या कार्यक्रमास ६० महिलांनी उद्योजकता शिबीरात सहभाग नोंदवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR