25.8 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeसोलापूर१७ ते २४ डिसेंबर दरम्यान महिलांची जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धा

१७ ते २४ डिसेंबर दरम्यान महिलांची जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धा

सोलापूर – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रिसीजन , ओॲसिस, इलिझियम-जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन १७ ते २४ डिसेंबर २०२३ या कालावधीत एम. एस. एल. टी. ए. टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे आयोजित केलेले आहे. या स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रिसिजन समूहाचे चेअरमन यतिन शहा व राजीव देसाई उपस्थित होते.

स्पर्धेची एकुण बक्षिस रक्कम २५,०००/- अमेरिकन डॉलर असून स्पर्धेतील खेळाडूंना जागतिक मानांकन गुण देखील प्राप्त होणार आहेत. अशा प्रकारची अंतरराष्ट्रीय स्पर्धा सोलापूरात आठव्यांदा भरविण्यात येत आहे. ही बाब सोलापूरसाठी अत्यंत अभिमानाची व प्रतिष्ठेची आहे. या स्पर्धेसाठी भारतासह १४ देशातून एकूण ५६ महिला सहभागी होणार असुन यामध्ये २२ महिला खेळाडू या परदेशी आहेत.

सोलापूर व लगतच्या जिल्हयामध्ये लॉन टेनिस खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा व सोलापूरचे नांव जागतिक पातळीवर व्हावे या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्याचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय टेनीस फेडरेशनने इराणच्या समन हसानी यांची सामना पर्यवेक्षक तर राज्य संघटनेचे संयुक्त सचिव राजीव देसाई यांची सामना संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेने श्रीराम गोखले (पुणे), सैकत रॉय (कलकत्ता), रोहित बालगवी (धारवाड), श्रध्दा दलि (मुंबई), रिया चाफेकर (पुणे), जॉय खलील (लेबनन), सोनम यंगचेन (भुतान) यांची नियुक्ती केलेली आहे.

स्पर्धेचा उदघाटन समारंभ सोमवार दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५. ०० वाजता . . कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या शूभहस्ते तसेच श्रीमती मनिषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेत उत्कृष्ट बॉल पिकरची सेवा बजावणा-या मुला- मुलींना तसेच स्पर्धेची उत्कृष्ट प्रसिध्दी व उत्कृष्ट छायाचित्र घेतलेल्या दैनिक वर्तमान पत्राच्या प्रतिनिधीस भेटवस्तु देऊन गौरवण्यात येईल.स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने दि. १७ व १८ डिसेंबर रोजी तर मुख्य फेरीचे सामने दि. १९ डिसेंबर २०२३ पासुन सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खेळविले जातील.

या स्पर्धेसाठी इव्हेंट मॅनेजर संध्याराणी बंडगर, फिजिओथेरपीस्ट सलोनी सराफ (पूणे), साक्षी लालन (मुंबई) ट्रान्सपोर्ट कोऑर्डीनेटर पूजा संचेती ,वेलफेअर ऑफिसर मोनिका आळंद, भोजन व्यवस्था सुनंदा पवार पहाणार आहेत तर व्हेनू इन चार्ज म्हणून सुधीर सालगुडे व पूजा सालगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी आशिष ढोले, अलि पंजवानी, मेहुल पटेल, ब्रिजेश गांधी, केशव रेडडी, सुहास अदमाने, श्रीधर देवसानी, असीम सिंदगी, राजेश पवार, अभिजीत टाकळीकर, सुनील मदान, डॉ वैभव मेरू, डॉ साजीद सय्यद, उज्वल कोठारी, संदीप देसाई, परेश शहा, संतोष पाठक यांचे सहकार्य लाभले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR