नवी दिल्ली : दिल्ली एम्सने पाच वर्षांच्या मुलीवर शुद्धीवर असताना मेंदूची शस्त्रक्रिया करून नवा विक्रम केला आहे. मुलीच्या मेंदूच्या डाव्या भागात ट्यूमर होता, तो एम्सने शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीपणे काढला. यासोबतच ही मुलगी शुद्धीवर राहून यशस्वीपणे शस्त्रक्रिया करणारी जगातील पहिली व्यक्ती ठरली आहे. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की मुलीने संपूर्ण प्रक्रियेत खूप सहकार्य केले आणि शेवटी परेशननंतरही ती बरी राहिली.
एम्सने सांगितले की न्यूरोएनेस्थेशिया आणि न्यूरोरॅडियोलॉजी टीमने मेंदूच्या एमआरआयचा चांगला अभ्यास केला आणि सर्व सदस्यांनी शस्त्रक्रियेदरम्यान चांगले टीमवर्क केले. अवेक क्रॅनिओटॉमी हे न्यूरोसर्जिकल तंत्र आणि क्रॅनिओटॉमीचा प्रकार आहे. यामध्ये मेंदूला होणारा हानी टाळण्यासाठी रुग्ण जागृत असताना सर्जनला ब्रेन ट्यूमर काढावा लागतो. शस्त्रक्रियेदरम्यान, न्यूरोसर्जन गंभीर भाग ओळखण्यासाठी कॉर्टिकल मॅपिंग करते, ज्याला स्पीच ब्रेन म्हणतात, यामुळे ट्यूमर काढताना त्रास होत नाही.
दरम्यान यापूर्वीही महाराष्ट्रातील नागपूर शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील मेंदूविकार उपचार विभागात डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला जागृत ठेवून रुग्णांच्या मेंदूतील ट्यूमर (गाठ) यशस्वीरित्या काढण्यात यश आले होते. त्यामुळे ट्यूमरच्या दोन रुग्णांना जीवदान मिळाले होते. रुग्णांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मिथिलेश गौतम (२०) आणि रेखा झांजाळ (३०) या दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना शुद्धीवर ठेवून मेंदूतील गाठी काढून टाकण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील मिथिलेश आणि मध्य प्रदेशातील रेखा यांना डोकेदुखीचा त्रास होत होता. कुटुंबियांनी त्यांना खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. खाजगी रुग्णालयात उपचार किफायतशीर नसल्याने अखेर त्यांना सुपर स्पेशालिटीमध्ये आणण्यात आले. ब्रेन ट्यूमरमुळे दोन्ही रुग्णांना बरोबर बोलता येत नव्हते. दोन्ही रुग्णांना ब्रेन ट्यूमर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.