मुंबई : झलक दिखला जा रॅप-अप पार्टीचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीम इंडियाचा अनुभवी ऑफ-स्पिनर यझुवेंद्र चहलला कुस्तीपटू संगीता फोगटने खांद्यावर उचलून घेत भिंगरीसारखा फिरवल्याचा तो व्हीडीओ आहे. संगीता फोगटने भिंगरीसारखा फिरवल्यानंतर चहलची भंबेरी उडाल्याचे चेह-यावरून स्पष्ट दिसते. त्यामुळे संगीताला तो थांबवण्याची विनंती करतो. चहलची पत्नी धनश्री वर्मा ‘झलक दिखला जा’ या शोमधील पाच फायनलिस्टपैकी एक होती.
चहलला अनपेक्षित जेव्हा संगीताने उचलून फिरवले तेव्हा पाहणा-यांना सुद्धा हसू आवरत नाही. त्यामधील काही जण अरे राहूदे, अरे राहूदे म्हणताना दिसून येतात.
दरम्यान, चालू हंगामासाठी बीसीसीआयसोबतचा करार गमावलेल्या सात क्रिकेटपटूंमध्ये चहलचा समावेश आहे. चहल यापूर्वी २०२२/२३ हंगामासाठी वार्षिक करारामध्ये सी श्रेणीचा भाग होता.
या निर्णयावर आश्चर्यचकित होऊन, भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने अजित आगरकर आणि त्यांची समिती इतर फिरकी पर्यायांकडे पहात असल्याचे म्हटले होते. मात्र, चहलच्या सर्व आशा संपलेल्या नाहीत. चहल येत्या आयपीएल २०२४ च्या हंगामात राजस्थान रॉयल्समध्ये दिसणार आहे. उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला सलग दुस-यांदा टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळू शकते.