22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeपरभणीमराठा आरक्षणासाठी परभणीत तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी परभणीत तरुणाची आत्महत्या

परभणी : ‘माझ्या मराठा समाजाला पक्के आरक्षण मिळवण्यासाठी सगेसोयरेचा कायदा पारित होणे आवश्यक आहे. परंतु शासन तो कायदा पारित करत नाही. या कारणामुळे मी आत्महत्या करत आहे.’ अशी चिठ्ठी लिहून परभणीच्या सेलू तालुक्यातील राजवाडी येथील प्रताप शेवाळे या मराठा तरुणाने आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सेलू तालुक्यातील राजवाडी येथील राहणारे प्रताप शेवाळे हा २७ वर्षीय युवक आज सकाळी आपल्या शेताच्या शेजारील असलेल्या बांधवांचा डबा देण्यासाठी म्हणून शेताकडे निघाला. पण तो शेजा-याच्या शेतात गेलाच नाही तर आपल्या शेतात जाऊन शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आज अकरा वाजेच्या दरम्यान परिसरातील शेतक-यांना झाडाला कोणीतरी गळफास लावल्याचे आढळून आले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

प्रताप शेवाळे या युवकाचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून तो शेती हा व्यवसाय करत होता. प्रतापला मराठा आरक्षण लवकरात लवकर लागू व्हावे, अशी मनापासून इच्छा होती. सेलू येथे मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी जी आंदोलने झाली त्यामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. अंतरवाली सराटी येथे देखील मनोज जरांगेच्या सभेला तो आवर्जून उपस्थित होता. मराठा आरक्षणाला वेळ होत आहे. त्यामुळे प्रतापने हे टोकाचे पाऊल उचलले. चिठ्ठीमध्ये ‘एक मराठा, लाख मराठा’ असे लिहित आपली जीवनयात्रा संपवणा-या प्रतापबाबत परभणी जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR