35.1 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeमनोरंजनजरीन खानला अंतरिम जामीन मंजूर

जरीन खानला अंतरिम जामीन मंजूर

परवानगीशिवाय परदेशात जाता येणार नाही

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानला एका फसवणुकीच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. जरीन कोलकाता न्यायालयात हजर झाली आणि तिला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. ती मुंबईहून कोलकात्यात आली आणि सोमवारी कोर्टात हजर झाली.

अंतरिम जामिनासोबतच कोलकाता शहरातील न्यायालयाने जरीनला परवानगीशिवाय परदेशात प्रवास न करण्याचे आदेश दिले आहेत. ती न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नाही.
जरीनने न्यायालयात जाताना चेहरा निळ्या मास्कने झाकलेला होता आणि काळी टोपी घातली होती.

आधारकार्डवरून तिची ओळख पटवल्यानंतर सुनावणी पार पडली. जरीन खानच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिला ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर २६ डिसेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच कोलकाता पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता तिला देश सोडून जाता येणार नाही, असेही आदेश दिले.
२०१८ साली ६ कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल जरीनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तिने जवळपास १२ लाख रुपये घेतले होते, पण ती कार्यक्रमांना उपस्थित राहिली नव्हती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR