24.4 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeअंतरराष्ट्रीयझेलेन्स्कींचे निमंत्रण स्वीकारले

झेलेन्स्कींचे निमंत्रण स्वीकारले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौ-याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ऑगस्टपासून दोन देशांच्या विदेश दौ-यावर रवाना होणार आहेत. विशेष बाब म्हणजे या दौ-यात नरेंद्र मोदी यूक्रेनचा दौरा देखील करणार आहेत. मोदींचा यावेळचा विदेश दौरा पोलंड आणि यूक्रेन या दोन देशांमध्ये असेल. नरेंद्र मोदी प्रथम पोलंडनंतर यूक्रेनच्या दौ-यावर रवाना होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत पुष्टी करण्यात आल्याची माहिती आहे.

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु झाल्यानंतर भारताने दोन्ही देशांनी युद्धाचा मार्ग वापरण्याऐवजी सांमजस्याने आणि चर्चेने विषय सोडवावा अशी भूमिका घेतली होती. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचा दौरा केला होता. आता नरेंद्र मोदी पोलंड आणि यूक्रेनचा दौरा करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यूक्रेनचा दौरा करत असल्यानं रशिया काय भूमिका घेणार हे देखील पाहावं लागणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या सचिव तन्मया लाल यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. पोलंड आणि यूक्रेनच्या राष्ट्रप्रमुखांनी दिलेल्या आमंत्रणानंतर नरेंद्र मोदी या देशांचा दौरा करणार आहेत. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदीमीर झेलेंस्की यांनी मोदींना आमंत्रण दिले होते. नरेंद्र मोदी रशिया यूक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर यूक्रेनच्या दौ-यावर जाणार आहेत. रशिया युक्रेन युद्धानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिलाच युक्रेन दौरा असल्याने जगभरातील नेत्यांचे मोदींच्या दौ-याकडे लक्ष असेल. पंतप्रधान मोदी २३ ऑगस्टला युक्रेन दौ-यावर जातील तत्पूर्वी ते २१ आणि २२ ऑगस्टला पंतप्रधान पोलंड देशाचा दौरा करणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR