अक्कलकोट -कोलकत्ता येथील पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणाऱ्या महिला डॉक्टरांवर पाशवी अत्याचार करून निघुण हत्या करून मोकाट फिरणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी अक्कलकोट मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनतर्फे काळ्या फिती लावून शहरातून प्रमुख मार्गावरून ए-वन चौक, फत्तेसिंह चौक, तूप चौक, कारंजा चौक ते पोलीस स्टेशन असा मूक मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
या मूक मोर्चात मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. विपुल शहा, डॉ. शिवारे, डॉ. योगेश वेळापूरकर, डॉ. मस्के, डॉ. बोकडे तसेच अक्कलकोट इनर व्हिलच्या अध्यक्षा सौरपाली शहा, रोटरी क्लब ऑफ अक्कलकोटचे चंचल जाजू वइतर पदाधिकारी तसेच वीरशैव महिला मंडळाच्या भगिनी उपस्थित होत्या. पोलिसांना निवेदन दिल्यानंतर सर्वजण तहसीलदारांना पण निवेदन अक्कलकोटचे पदाधिकारीदेखील यावेळी उपस्थित होते. डॉ. विपुल शहा, डॉ. पवित्रा मलगोंडा, आसावरी पेडगावकर, डॉ. शिवणगी आदी उपस्थित होते.
डॉक्टरांचे संरक्षण झाले तरच जनतेच्या आरोग्याचे रक्षण होणार आहे. यामुळे डॉक्टरांच्या या आंदोलनात लहुजी शक्तीसेना जिल्हा अध्यक्ष वसंत देडे यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला. या आंदोलनात लहुजी शक्ती सेना, जिल्हा कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होते. डॉक्टरांना न्याय मिळवून देण्यासाठी लहुजी शक्ती सेनाही पुढाकार घेईल अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी दिली आहे.