18.3 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeक्रीडाअखिल भारतीय कुलगुरु टी-२० चषक स्पर्धेकरिता वनामकृविचा संघ रवाना

अखिल भारतीय कुलगुरु टी-२० चषक स्पर्धेकरिता वनामकृविचा संघ रवाना

परभणी : राष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठ कर्मचा-यांची १९ वी अखिल भारतीय कुलगुरु टी २० चषक स्पर्धा दि.२६ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. या क्रिडा स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा संघ सहभागी होणार आहे. वनामकृविचा संघ दि. २४ डिसेंबर रोजी रवाना झाला.

कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या कर्मचारी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. संघाचे कर्णधार डॉ.धीरज पाथरीकर आहेत. कुलगुरू डॉ.मणि यांनी १९ वी अखिल भारतीय कुलगुरु टी-२० चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करून विद्यापीठाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करावा असे सांगून शुभेच्छा देवून मैदानी खेळामुळे शरीर स्वस्थ चांगले राहते, कार्यक्षमता वाढीस लागते, असे ते म्हणाले.

यापूर्वी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित अखिल महाराष्ट्र टी-२० क्रिकेट स्पर्धेत वनामकृवि परभणीचा संघ प्रथमच सहभागी झाला होता. त्यावेळी संघाने ५ पैकी तीन सामने जिंकून चांगली कामगिरी केली. वनामकृवि परभणीच्या संघातील मारोती शेल्लाळे यांना स्पेर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून पुरस्कार मिळाला होता.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR