26.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeअखेर दम्यावर नवे औषध शोधण्यात संशोधकांना यश

अखेर दम्यावर नवे औषध शोधण्यात संशोधकांना यश

लंडन : वृत्तसंस्था
दम्याचा झटका येणं यावर गेल्या ५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच नवीन औषध सापडले असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या नवीन औषधाचा वापर रोग प्रतिकार यंत्रणेतील ठराविक भागावर केला जातो. दमा आणि फुफ्फुसांच्या क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिज (सीओपीडी) नावाच्या आजाराचा त्रास वाढल्यानंतर हाच भाग अधिक सक्रिय होण्याची शक्यता असते.

‘बेन्रालिझुमॅब’चा वापर आधीपासूनच अधिक गंभीर रुग्णांसाठी केला जात आहे. पण नवीन संशोधनावरून असं लक्षात येत आहे की, युकेमध्ये दरवर्षी दम्याचा झटका येण्याच्या जवळपास २० लाख प्रकरणांमध्ये त्याचा वापर केला जात आहे.

लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील संशोधकांच्या पथकाच्या मते, हे नवीन औषध गेम चेंजर ठरू शकते. एका अभ्यासात १५८ रुग्णांचे निरीक्षण करण्यात आले. तीन महिने त्यांच्या या त्रासाच्या उपचाराची नोंद ठेवण्यात आली. लँसेट रेस्पिरटरी मेडिसिनच्या निष्कर्षानुसार उपचारात अपयश येण्याचे प्रमाण हे स्टेरॉइड्स घेत असताना ७४% होतं तर नवीन उपचार पद्धतीचा वापर करून ते फक्त ४५% टक्के एवढे असल्याचे समोर आले.

नव्या पद्धतीने उपचार केलेल्या लोकांना तुलनेनं रुग्णालयात दाखल करावे लागण्याची, पुन्हा उपचार घ्यावे लागण्याची किंवा त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी असते. युकेमध्ये दररोज दम्यामुळे अंदाजे ४ तर ‘सीओपीडी’मुळे अंदाजे ८५ जणांचा मृत्यू होतो.

वैद्यकीय श्रेत्रात काम करणा-या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. समांथा वॉकर यांच्या मते, हे निकाल म्हणजे मोठी बातमी आहे. दमा आणि ‘सीओपीडी’चे झटके येणा-या रुग्णांसाठीच्या उपचार पद्धतीत गेल्या ५० वर्षांतील हा पहिलाच नवा शोध असणे हे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR