सोलापूर : शहरातील जोडभावी पेठ, जेलरोड, आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, नितीन विठ्ठल भोसले (वय २८ वर्षे, रा. २७/३ रविवार पेठ, जोशी गल्ली, सोलापूर) हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन बेकयदेशीर दगडफेक, खंडणी मागणे, जबरी चोरी अशा स्वरूपाचे गुन्हे करीत आला असून त्याच्या कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्याच्याविरुध्द पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी एमपीडीए अन्वये स्थानबध्दतेची कारवाई केलीय.
नितीन भोसले हा ईच्छापूर्वक शस्त्रानीशी दुखापत करणे, व घातक शस्त्रानीशी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्याविरुध्द अशा प्रकारे गंभीर स्वरुपाचे ०३ गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे.
नितीन भोसले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असून, त्याच्याविरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत, असं पोलीसांचं म्हणणं आहे.
नितीन भोसले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२४ मध्ये क. ११० (ई) (ग) फौ.प्र.सं अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली. त्यामुळे त्या या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी, १६ मे२०२४ रोजी त्याच्याविरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आलं आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-०१) अशोक शा. तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे, वपोनि सुहास चव्हाण (जोडभावी पेठ पोलीस ठाणे), पोउपनि/विशेंद्रसिंग बायस (गुन्हे शाखा), एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी पार पाडली.