27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रअत्याचारांनी हादरला विदर्भ!

अत्याचारांनी हादरला विदर्भ!

एकाच दिवशी चार जिल्ह्यांमध्ये घटनांच्या नोंदी

नागपूर : प्रतिनिधी
बदलापूरमधील विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटनेवरून राज्यात संताप व्यक्त होत असताना शुक्रवारी विदर्भात याच प्रकारच्या चार गुन्ह्यांची नोंद झाली. बुलडाणा आणि अमरावतीमध्ये शिक्षकांनीच विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला. चंद्रपूर जिल्ह्यात एका गतिमंद महिलेवर अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल करण्यात आला. अकोल्यात सलग तिस-या दिवशी अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. नात्यातीलच युवकाने दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केला. या वाढत्या घटनांवर अंकुश आणण्याची मागणी यानिमित्ताने जोर धरत आहे.

दरम्यान, पहिल्या घटनेत अकोला जिल्ह्यातील विद्यार्थिनीच्या विनयभंगाचे प्रकरण ताजे असताना बुलडाणा जिल्ह्यात सात मुलींचा एका शिक्षकाने लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. सिंदखेड राजा तालुक्याच्या वर्दडी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली. खुशाल शेषराव उगले असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्याला तातडीने निलंबित केले आहे. वर्दडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत उगले आठ-दहा वर्षे वयोगटातील मुलींना वर्गात बोलावून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करीत होता. मुलींकडून हात-पाय चेपून घेणे, नको त्या जागी स्पर्श करणे, असे प्रकारही हा करीत होता. मागील वर्षभरापासून त्याचे हे कृत्य सुरू होते.

दुस-या घटनेत अमरावती शहरातील चपराशीपुरा परिसरातील एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्­याची घटना शुक्रवारी समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी या शिक्षकाविरुद्ध गुन्­हा दाखल करून अटक केली आहे. रियाजउद्दिन शेख शफीउद्दिन शेख (५०) असे या घटनेतील आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

तिस-या घटनेत चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीडमध्ये एका गतिमंद महिलेवर अत्याचाराची घटना घडली आहे. आरोपींनी या अत्याचाराचा व्हीडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरलही केला होता. नागभीड बसस्थानकातील प्रसाधनगृहात १२ ऑगस्टच्या मध्यरात्री या गतिमंद महिलेवर आरोपीने अत्याचार केला. याचा व्हीडीओ दुस-या आरोपीने मोबाईलमध्ये तयार केला आणि एका मित्राला सोशल मीडियाद्वारे पाठविला.

चौथ्या घटनेत ठार मारण्याची धमकी देऊन नात्यातीलच युवकाने एका दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी अकोल्यात घडली. अकोट फैल पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. यश गवई (२४) असे अत्याचार करणा-या युवकाचे नाव आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR