28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रअन्त्यविधीतील गर्दीत भरधाव ट्रक घुसला, ४ जणांना चिरडले

अन्त्यविधीतील गर्दीत भरधाव ट्रक घुसला, ४ जणांना चिरडले

पुणे : नगर-कल्याण महामार्गावर भरधाव ट्रकने ४ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे चार जण अन्त्यविधी उरकून परत येत होते. या घटनेमध्ये चार जणांचा मुत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नगर-कल्याण महामार्गावर असलेल्या गुळुंजवाडी (ता. जुन्नर) या गावात शुक्रवारी सकाळी अन्त्यविधी होता.

या गावची स्मशानभूमी या मार्गाच्या बाजूला असून अन्त्यविधी उरकल्यानंतर नागरिक रस्त्याच्या बाजूने जात असताना त्याचवेळी नगरकडून भरघाव वेगाने आलेला एम.एच.१० ए. डब्लू ३२९७ हा ट्रक महामार्गाच्या कडेला लावलेल्या पाच ते सहा वाहनांना उडवून अन्त्यविधी उरकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला, यामध्ये शीतल योगेश दाते (वय ३०, रा. आणे), श्रीयांश योगेश दाते (वय ५, रा. आणे), दत्तात्रय लक्ष्मण गोसावी (वय ६२, रा. गुळुंजवाडी) या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर नंदाराम पाटील बुवा भांबेरे (वय ८०, रा. गुळुंजवाडी) यांचा उपचार सुरू असताना मुत्यू झाला .

सुधीर काशिनाथ गुंजाळ, अमोल नाथा गुंजाळ, ज्ञानदेव नामदेव कर्डिले, विठ्ठल हरिभाऊ जाधव, योगेश नारायण राणे, धोंडिभाऊ सदाशिव पिंगट यांच्यावर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR