32 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeलातूरअभय साळुंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

अभय साळुंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

निलंगा : प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार काँग्रेसचे अभय साळुंके यांनी सोमवार दि २८ ऑक्टोबर रोजी माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख व खासदार डॉ शिवाजी काळगे यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करीत वाजत गाजत शहरातून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत गर्दी करीत भव्य रॅली काढण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे अ‍ॅड संभाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष संजय शेटे, जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब पाटील, काँग्रेसचे निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, देवणी तालुकाध्यक्ष अजित बेळकुने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी सभापती अजित माने, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, पंकज शेळके, चेअरमन गंगाधर चव्हाण, प्रमोद मरुरे, सुतेज माने , अजित ंिनंबाळकर, शिवसेनेचे उजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, महादेवी पाटील, रेखाताई पुजारी, शकील पटेल, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मदन बिरादार, उपसरपंच महेश भंडारे, हाजी सराफ, शकील पटेल, गोरख नवाडे, पद्मंिसह पाटील आदीसह काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करून भव्य रॅली काढत काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR