अमरावती : लोकसभा निवडणूकींच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार अमरावतीत आतापर्यंत झालेल्या लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा पिछाडीवर होत्या.
तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पहिल्या कलामध्ये आघाडी मिळाली आहे. दरम्यान, अमरावतीत तिहेरी लढत पाहायला मिळाली. प्रहार कडून दिनेश बुब यांना मैदानात उतरवण्यात आले होते.
आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी प्रहार कडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली. २०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता. पण त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती करत महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
मात्र सध्या समोर आलेल्या मतमोजणी नुसार अमरावतीतून महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा पराभूत झाल्या असून, बळवंत वानखडे विजयी झाले आहेत.