वाशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरातील २.५७ किमी लांबीचा फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज कोसळल्यानंतर बेपत्ता झालेल्या ६ बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. कंटेनर जहाजातील दोन वैमानिकांसह भारतीय क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेली शोधमोहीमही बुधवारपर्यंत थांबवण्यात आली होती.
मेरीलँड राज्यातील बाल्टिमोर शहरात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. फ्रान्सिस स्कॉट पूल मालवाहू जहाजाची धडक बसल्याने कोसळला. मोठ्या मालवाहू जहाजाने पुलाला धडक दिल्याने पॅटापस्को नदीत कोसळला.
या दुर्घटनेत २० हून अधिक लोक आणि अनेक वाहने नदीत कोसळली असल्याची प्राथमिक माहिती बाल्टिमोर शहर अग्निशमन विभागाने दिली होती. यातील बेपत्ता झालेल्या सहा कामगारांचा मृत्यू झाल्याचे, मेरीलँड पोलिसांनी सांगितले.