15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरअर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी

अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी

नोटीस बजावताच केली पूर्तता

लातूर : प्रतिनिधी
अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी दि. २९ ऑक्टोबर रोजी भाजपा महायुतीकडून लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु, त्यांच्या उमेदवारी अर्जात काही त्रुटी आढळून आल्याने दि. ३० ऑक्टोबर रोजी निवडणूक विभागाने त्यांना नोटीस बजावली. नोटीस बजावताच त्यांनी सकाळी ११ वाजेपर्यंत त्या त्रुटींची पूर्तता केली.

अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या उमेदवारी अर्जात काही त्रुटी आढळून आल्याने त्रुटींची पूर्तता करण्याबाबत त्यांना निवडणूक विभागाने त्यांना नोटीस बजावली. नोटीस मिळाल्यानंतर अर्चनाताई पाटील यांनी बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत त्रुटींची पूर्तता केली.

अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारी अर्जातील काही कॉलम्समध्ये त्रुटी होत्या. त्यामुळे निवडणूक विभागाने त्यांना नोटीस बजावली होती. नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी त्रुटींची पूर्तता केली आहे, अशी माहिती लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR