23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरआज, उद्या पं. स. जि. प. सुरू राहणार

आज, उद्या पं. स. जि. प. सुरू राहणार

लातूर : प्रतिनिधी
आर्थीक वर्ष संपण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिल्याने शासनाकडून येणारे अनुदान, निधी वेळेत खर्च होण्यासाठी शनिवार व रविवारी जि. प. व सर्व पंचायत समित्यांचे कामकाज नियमित सुरू राहणार आहे. तसेच शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी रद्द करून जि.प. पं. स. यांची सर्व कार्यलये सुरू असल्याचे दिसून आले.
२०२३-२४ या अर्थिक वर्षासाठी ३१ मार्च २०२४ हा वर्षे अखेरीस दिवस असल्याने पंचायत समित्या व जिल्हा परिषदेच्या विभागाअंतर्गत विविध योजना, विकास कामासाठी अनुदाने शासनाकडून अथवा  वरीष्ठ कार्यालयाकडून प्राप्त होत असतात. त्यामुळे सदरची प्राप्त  होणारी अनुदाने बीडीएस प्रणालीव्दारे देयके तयार करुन कोषागार  कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.  तसेच जिल्हा परिषद अंतर्गत  विविध योजना, विकास कामासाठी प्राप्त निधी, अनुदाने इत्यादी विहित मुदतीत निपटारा होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने दि. ३० व ३१ मार्च २०२४ रोजी सार्वजनिक, साप्ताहिक सुटटी असली तरीही संबधीत कार्यालये नियमित पणे सुरु राहतील. सदर दिवशी कोणताही कर्मचारी अनुपस्थित राहणार नाही, याबाबत कार्यालय प्रमुखांनी दक्षता घेण्यात यावी, अशा सुचना जि. प. प्रशासनाने दिल्या सर्वांना दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR