चाकूर : प्रतिनिधी
आजी-आजोबाच्या आशीर्वादामुळे सन्मान यात्रा यशस्वी होणार असून या सन्मान यात्रेला समाजातूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन खासदार अजित गोपछडे यांनी केले आहे. येथील विविध विशाल कार्यकारी सेवा सहकारी सोसायटाच्या वतीने राष्ट्रीय आजी-आजोबा दिनाचे औचित्य साधून आजी-आजोबांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात २६ आजी-आजोबा यांचा सत्कार फेटा, शाल, पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यांत आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डॉ.गोंिवंदराव माकणे हे होते तर मंचावर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.सौ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, गणेश हाके पाटील, नितीन शेटे, नगराध्यक्ष कपिल माकणे, उपनगराध्यक्ष अरंिवंद बिराजदार, राजेश्वर बुके, विवेकानंद उजळबंकर, अॅड.युवराज पाटील, बालाजी तलवारे हे उपस्थित होते. या सन्मान यात्रेची माहिती नितीन शेटे यांनी सांगीतली. ते म्हणाले की, वीरशैव ंिलंगायत समाजाची ही सन्मान यात्रा भक्तीस्थळ राजूर येथुन ंिद ५ सप्टेबंर रोजी निघाली असून ही यात्रा शक्तीस्थळ मंगळवेढा येथे २१ सप्टेबंर रोजी पोहोचणार आहे. ही सन्मान यात्रा १५ जिल्ह्यातून जाणार आहे.
या प्रसंगी डॉ.सौ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, गणेश हाके पाटील, नगराध्यक्ष कपिल माकणे यांनी समोयोचित मार्गदर्शन केले. चेअरमन डॉ.गोंिवंदराव माकणे यांनी अध्यक्षीय समारोप केला. नगरसेवक नितीन रेड्डी, जाकीरहूसेन कोतवाल, मन्मथ पाटील, अजय नाकाडे, मन्मथ पाटील, दिगांबर मोरे, हनमंत उस्तुर्गे, दिलीप गोलावर, रघुनाथ मोरगे, व्यंकट धोंडगे, किशन रेड्डी, ज्ञानोबा लोखंडे, ज्ञानोबा इंद्राळे, बाबुराव ढोबळे, राजाराम माने, गुरूनाथ सांगवे, पंडीत मोरे, धोंडीराम तोंडारे, रामचंद्र नरवटे, प्रकाश तेलंग, आत्माराम डाके, बाळू लाटे, पपन कांबळे, धोंडीराम पेंटर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संचालक शिरीष रेड्डी यांनी केले तर उपंिस्थताचे आभार व्यवस्थापक कपिल आलमाजी यांनी मानले.