पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील जनतेचे मन:पूर्वक आभार. एक वर्षापूर्वी आम्ही कुठे होतो? आणि आज कुठे आहोत? एक वर्षापूर्वी पक्ष कुठे होता? चिन्ह कुठे होतं? आमदार-खासदार जी, जी सत्तेची पदं होती, त्यातील पक्ष, चिन्ह घेऊन आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून ते घेऊन गेले.
मुलीचा वाढदिवस कोर्टात केला मी. ‘सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली, कारण का मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे, अदृश्य शक्तीला असं वाटतं की अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते. या राज्याने दाखवून दिलं की अदृश्य शक्ती ते चालवू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
गडकरी साहेब विकासाच्या मुद्यावर राजकारण करत नाहीत. ते म्हणाले की, वेळ पडली तर पूर्ण कॉन्ट्रॅक्ट रद्द करू, नवीन निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर रस्ता पूर्ण करू. ‘अतिथी देवो भव’! पाहुण्यांचे स्वागत झालेच पाहिजे, आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही. आम्ही संविधानवाले आहोत, संविधान केंद्र ठेवून आम्ही राजकारण करतो, सशक्त लोकशाहीमध्ये दिलदार विरोधक असला पाहिजे, शरद पवार यांना रोखा, उद्धवजींना रोखा आणि वेळ पडली तर पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा आणि सत्तेमध्ये या’’ अशी त्यांची विचारसरणी असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.