22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरआमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते टेंबी, वरवडा येथे विकास कामांचे लोकार्पण

आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते टेंबी, वरवडा येथे विकास कामांचे लोकार्पण

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण मतदारसंघांमधील औसा तालुक्यातील टेंबी येथे ४१ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. दरम्यान, औस तालुक्यातील वरवडा येथे साडे अठरा लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभही त्यांनी त्यावेळी केला. टेंबी येथे स्थानिक आमदार विकास निधीतून झालेल्या ग्रामपंचायत पाणीपुरवठ्यासाठी बोअरवेल घेणे व विद्युत पंप टाकणे (१ लक्ष), ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेत बांधलेले सभागृह (१० लक्ष), टेंबी ते खानापूर तांडा
रस्त्याचे मजबुतीकरण करणे  (९.९९ लक्ष), पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र डीपी  बसविणे (१.९९ लक्ष), गावांतर्गत २ सिमेंट रस्ते (१८ लक्ष) आदी विकासकामांचे यावेळी लोकार्पण करण्यात आले.
वरवडा (ता. औसा) येथे स्थानिक आमदार विकास निधीतून मंजूर पंढरी कदम ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत सिमेंट रस्ता करणे (७ लक्ष), दलित वस्तीतील श्री बालाजी पांचाळ यांचे घर ते सुंदराबाई गायकवाड यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे (५.३० लक्ष) व  जिल्हा परिषद शाळेत क्रीड  मैदान विकसित करणे (५ लक्ष) आदी विविध कामांचा शुभारंभ आमदार धिरज विलासराव  देशमुख यांच्या हस्ते करण्यात  आला. यावेळी श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, काँग्रेसचे  समन्वयक सचिन दाताळ, नारायण लोखंडे, महेंद्र भादेकर, सदाशिव कदम, अनुप शेळके, रघुनाथ शिंदे, कृषी सहाय्यक एस यु जवादे, ग्रामसेवक डी. सी. कांबळे, हमीद सय्यद, अकबर सय्यद, राजाभाऊ चव्हाण, वामन मोरे, चंद्रकांत पाटील, गुणवंत कारंडे, भैरवनाथ गवळी, शरद सर्जे, निर्मला कांबळे, केशव सर्जे, दशरथ सर्जे, प्रदीप शिंदे, हरेश्वर कारंडे, विकास पाटील,  विठ्ठल रोंगे, धनराज रोंगे, उमाकांत कारंडे, रामेश्वर गवळी आदीसह टेंबी, येल्लोरी वाडी, वरवडा, ंिरगणी येथील काँग्रेसचे
पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR