27.4 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeलातूरआमदार धिरज देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे रस्ते होणार दर्जेदार

आमदार धिरज देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे रस्ते होणार दर्जेदार

लातूर : प्रतिनिधी
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अडीच कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता मिळवून दिल्यानंतर लातूर ग्रामीणचे आमदार  धिरज विलासराव देशमुख यांनी आता जिल्हा नियोजन समितीमधून मतदारसंघातील रस्ते आणि पुलांसाठी तब्बल साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. त्यामुळे मतदारसंघातील वेगवेगळे रस्ते आता दर्जेदार होतील.
ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण या योजनेतून लातूर तालुक्यातील काटगाव येथे काटगाव ते लमाणतांडा रस्ता ग्रामा १९ ची सुधारणा, तांदुळवाडी येथे तांदूळवाडी ते ग्रामा ८२, रामा ९ रस्ता पुलाचे व जोड रस्ते, तांदूळवाडी ते टाकळी फाटा पर्यंत रस्ता पुलाचे व जोड रस्ते, तांदूळवाडी ते सामानगाव रस्ता ग्रामा २४ ची सुधारणा, रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे खरोळा ते कुंभारवाडी रस्ता ग्रामा ७१ ची सुधारणा, मोटेगाव येथे मोटेगाव ते धानोरा ग्रामा ११८ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, रामवाडी ख. येथे राज्य ग्रामीण मार्ग २४५ ते  रामवाडी ग्रामीण मार्ग ७० रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम, ब्रम्हाडी येथे इजिमा २० ते ब्रह्मवाडी रस्ता व पुल ग्रामा ७६ ची सुधारणा, औसा तालुक्यातील वानवडा येथे वानवडा ते शिवली मोड ग्रामा ७४ रस्ता सुधारणा करणे ही कामे होणार आहेत.
इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण या योजनेतून रेणापूर तालुक्यातील मोहगाव (तळणी) येथे रामा २४८ ते मोहगाव इजीमा १० रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम, टाकळगाव येथे टाकळगाव-घनसरगाव-मोहगाव रस्ता मजबुतीकरण करणे, इंदरठाणा येथे इंदरठाणा ते नागझरी  ईजिमा २० रस्ता पुलाचे व जोड रस्ता काम, लातूर तालुक्यातील धनेगाव येथे प्रजिमा ५९ धनेगाव उमरगा ते प्रजीमा १६ पर्यंतचा रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम, चिकलठाणा येथे रामा २४८ ते चिकलठाणा इजीमा ११ भातांगळी रस्ता प्रजिमा १९ रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम, चिकलठाणा येथे रामा २४८ ते चिकलठाणा ते इजीमा ११ भातांगळी रस्ता प्रजिमा १९ रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम, औसा  तालुक्यातील वरवडा येथे इजीमा १२० ते वरवडा इजिमा ११९ रस्ता सुधारणा करणे, ंिरगणी येथे इजिमा ११९ ंिरगणी गुळखेडा रोड नाल्यावर साखळी क्रमांक १०/५०० वर पोहोच मार्गासह पुलाचे बांधकाम करणे, समदर्गा येथे समदर्गा  कोरंगळा येल्लोरी इजिमा ११७ (४/०० ते ५/५००) रस्ता सुधारणा  करणे अशी विविध कामे होणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR