23.5 C
Latur
Wednesday, September 25, 2024
Homeलातूरआमदार धिरज देशमुख यांनी लातूर ग्रामीणमध्ये नागरी सुविधा पोहोचल्या

आमदार धिरज देशमुख यांनी लातूर ग्रामीणमध्ये नागरी सुविधा पोहोचल्या

लातूर : प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षांत लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी रेणापूर तालूकासह ग्रामीणच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निघी आणला आहे. या निधीतून रस्ते, पाणी, वीज, आरोग्याच्या सुविधा, शैक्षणिक सुविधा मोठया प्रमाणात निर्माण करता आल्या आमदार धिरज देशमुख यांच्यामुळेच रेणापूर तालूकासह ग्रामीणचा चेहरा-मोहरा बदललाÞ त्यामुळे पुन्हा एकदा सर्व मतदार बंधु-भगिणी आमदार धिरज देशमुख यांना आशिर्वाद देतील, असा विश्वास विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
रेणापूर तालूक्यातील खरोळा व रेणापूर शहर येथे दि. १३ ऑगस्ट रोजी महिला बचतगटांचा संवाद मेळावे झालेÞ त्याप्रसंगी बचत गटाच्या महिलांशी संवाद साधताना श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख बोलत होत्या. यावेळी रीड लातूरच्या संस्थापक सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांच्यासह डॉ. सारीकाताई देशमुख, सुनिताताई आरळीकर, अनिता केंद्रे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, रेणाचे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, मध्यवर्ती बॅकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, युवराज जाधव, सरपंच धनंजय देशमुख, पुजा इगे, सीमा क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या की, मागील काळात भाजपाने सत्तेसाठी घरे फोडण्याचे काम महाराष्ट्रात केले. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काहींही करुन सत्ता मिळवणे हाच भाजपाचा अजेंडा होता. त्यासाठी घरेफोडण्यापासून ते जातीय तेढ निर्माण करण्यापर्यंत त्यांची मजल गेलीÞ परंतु, मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. त्यांना हवे ते मतदारांनी मिळू दिले नाही. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार खोट्या जाहिरातींवर भर देत आहे. मतदार सुजान आहेत.  परंतू, भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे महायुतीचे सत्ताधारी भोळया मतदारांना जाहिरातीच्या माध्यमातून फसविण्याचा प्रयत्न करीत आहेतÞ मतदारांनी त्यांच्या खोट्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन केलेÞ  खरोळा येथील दत्त मंदिरात दर्शन घेवून मंदिर हॉल येथे महिला बचतगटाचा मेळावा घेण्यात आला. गेल्या पाच वर्र्षांत आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी  केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी दिलीÞ.
रेणापूर येथील महालक्ष्मी रेणूकादेवी मंदिरात मनोभावे आरती झाल्यानंतर माने यांच्या निवासस्थानी बचत गटांचा महिला मेळावा झाला. यावेळी महिलांशी संवाद साधताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या की,  मागील काळात आपण सर्वांनी धिरज देशमुख यांना दिलेल्या आर्शिवादामुळेच ते आमदार झाले आणि त्यांना रेणापूरचा विकास करता आलाÞ त्यामुळे आमदार धीरज देशमुख यांना पुन्हा संधी देवून आपल्या रेणापूरनगरीचा विकास करण्याची संधी द्यावी, असे आवाहन केले.
खरोळा येथील महिला बचत गटाच्या मेळाव्यास शिवकन्या पिपळे, अनुजा गिरी, सुर्वणा खंडापुरे, आशा रवळे, अश्वीनी आदुडे, सुरेखा रावूतराव, सुनिता सोमवंशी, शीतल जाधव, सारिका राऊतराव, मनिषा गिरी, लक्ष्मी बांडे, कविता गिरी, शीतल टोंपे, सविता ंिपपळे, लक्ष्मी शिंदे, अनिल गिरी, राहूल कांबळे, भागवत आडतराव, शब्बीर कोतवाल, नरहरी आंदुरे आदींसह गावातील नागरीक व बचतगटातील महिला मोठया संख्येने उपस्थितीत होत्या. तर रेणापूर येथील महिला बचत गटाच्या मेळाव्यास शुभांगी माने, अर्चना माने, पुजा इगे, रझीया शेख, कांताबाई माने, वंदना माने, सुनिता माने, मिरा माने, वैशाली माने, सुनंदा  कातळे, रिकू माने, मिरा कातळे, सुरेखाताई, मयुरी जाधव, वैष्णवी माने, प्रतिक्षा माने, ज्ञानेश्वरी माने आदी उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR