रेणापूर : प्रतिनिधी
शिवजयंतीनिमीत तालुक्यातील इंदरठाणा येथील श्री शिव छत्रपती प्रतिष्ठाणच्या वतीने ‘इंदरठाणा फेस्टिवल २०२४’ चे आयोजन सोमवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी जि.प. प्रा. शाळेत करण्यात आले असून या निमित्त्त विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांतील स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष महादेव उबाळे यांनी केले आहे.
श्री शिव छत्रपती प्रतिष्ठाणच्या वतीने गेल्या ७ वर्षांपासून शिवजयंतीनिमित्त फेस्टीवलचे आयोजन केले जाते. फेस्टिवलचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौ वर्षा ठाकुर (घुगे) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी माजी आमदार त्र्यंबक भिसे हे राहणार असून विशेष उपस्थिती सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासह टेवन्टी वन कारखान्याचे उपाध्यक्ष विजय देशमख, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, रेणा कारखान्याचे तज्ज्ञ संचालक लालासाहेब चव्हाण, रेणापूर खरेदी विक्री संघाचे संचालक बाबासाहेब वीर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्वागत उत्सुक म्हणून गावचे सरपंच अविनाश रणदिवे, लातूर ग्रामीण विधानसभा अल्पसंख्याकचे अध्यक्ष अशादुल्ला सय्यद, उपसरपंच इब्राहीम सय्यद,सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब वीर, दत्ता क्षीरसागर, अमोल घोडके ग्रामस्थ उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव उबाळे, उपाध्यक्ष व्यंकट उबाळे, सहसचिव श्रीकृष्ण जाधव, सदस्य सौ. पार्वती महादेव उबाळे , सौ.शारदा व्यकंट उबाळे यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.