31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइराणच्या अणू कार्यक्रमाचे डॉक्युमेंट मोसादने पळविले

इराणच्या अणू कार्यक्रमाचे डॉक्युमेंट मोसादने पळविले

जेरुसलेम : वृत्तसंस्था
इस्रायलची मोसाद ही जगप्रसिद्ध गुप्तचर संस्था आहे. गाझामध्ये हमास असो, लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह असो अथवा इराण असो; इस्रायली गुप्तचर संस्थेचे डावपेच नेहमीच वरचढ ठरले आहेत. महत्वाचे म्हणजे, या संस्थेने यापूर्वीही, हमास, हिजबुल्लाह आणि इराणचे अनेक प्लॅन फ्लॉप केले आहेत. यातच आता मोसाद इराणचे १ लाख अत्यंत गोपनिय न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन भूर्र झाल्याचा दावा केला जात आहे.

इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांनी ‘सीएनएन’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, इस्रायली गुप्तचर संस्थेचे प्रयत्न फेल करण्याच्या हेतूने इराणने एक गुप्तचर युनिट तयार केले होते. जिचा हेड नंतर एक इस्रायली एजन्ट निघाला. एवढेच नाही तर, युनिटच्या हेड शिवाय डिव्हीजनचे आणखी २० लोकही इस्रायली एजन्सी मोसादचे एजन्ट आढळले, असेही त्यांनी सांगितले.

इराणचा आण्विक कार्यक्रम आजपर्यंत यशस्वी होऊ शकलेला नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे इस्रायल. इराण न्यूक्लिअर संपन्न देश होणे इस्रायलच्या दृष्टीने घातक आहे. यासंदर्भात बोलताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी २०१८ मध्ये मोठा खुलासा केला होता. या ऑपरेशनमध्ये मोसादचे एजन्ट्स तेहरानच्या एका सीक्रेट गोदामात शिरले होते आणि सहा तासांच्या ऑपरेशनमध्ये तिजोरी तोडून १,००,००० हून अधिक डॉक्यूमेन्ट्स सोबत घेऊन गेले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR