नवी दिल्ली : वृत्तसंस्था
‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला गुरुवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. आता सरकार पुढच्याच आठवड्यात हे विधेयक सभागृहात आणण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जेपीसी स्थापन करून सर्व पक्षांच्या सूचना घेतल्या जातील. यानंतर हे विधेयक संसदेत सादर करून संमत केले जाईल. तत्पूर्वी, रामनाथ कोविंद यांच्या समितीने सरकारला यासंदर्भात अहवाल सादर केला होता.
सध्या देशात वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या वेळी निवडणुका होतात. मात्र हे विधेयक मंजूर झाल्यानंतर, एकाच वेळी सर्वत्र निवडणुका घेतल्या जातील.