24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूरएकाच दिवसात तब्बल ८.५ कोटी कर संकलन

एकाच दिवसात तब्बल ८.५ कोटी कर संकलन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील थकीत मालमत्ताधारकाकडून लोकअदालतीसह शास्ती माफी योजनेस दि. २८ सप्टेंबर रोजी प्रचंड प्रचंड प्रतिसाद मिळाला. २ हजार ५०० मालमत्ताधारकांकडून एकाच दिवसात ८.५ कोटी रुपये कर संकलीत करण्यात आला.
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकाकडून  सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात १०० टक्के कर वसुली करण्याचे निर्देश मनपा आयुक्त्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी कर संकलन विभागास दिले होते. त्यादृष्टीने उपायुक्त्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभाग वर्षाच्या सुरुवातीपासूनच टॅक्स वसुलीच्या दृष्टीने विविध उपक्रम, योजना  राबवित आहे. त्यानुसार मालमत्ताधारकाना विविध सूट, सवलती देण्यात आले होते.  सोबतच थकबाकीदार मालमत्ताधारक यांच्याकडील थकीत कराची रक्कम पाहता ही प्रकरणे लोकअदालतमध्ये  ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याकरिता १०० टक्के शास्ती माफी योजना एक दिवसासाठी संपूर्ण मालमत्ताधारकासाठी लागू करण्यात आली होती.
त्यामध्ये लोकअदालत सोबतच शहरातील इतर थकबाकीदार असे मिळून तब्बल २ हजार ५०० थकबाकीदार मालमत्ताधारकाकडून एकाच दिवसात ८.५ कोटी चा कर संकलन  करण्यात कर विभाग यशस्वी झाला आहे. १०० टक्के शास्ती माफी योजना व लोक अदालतमध्ये अधिकाधिक नागरीकाना सहभागी होता यावे या दृष्टीने कर अधीक्षक सतिष टेंकाळे, मनपा कायदे सल्लागार अ‍ॅड. येरटे,  क्षेत्रीय अधिकारी माने, अजित डोपे, पवन सुरवसे, राजुरे यांच्यासह सर्व कर पर्यवेक्षक व वसुली लिपिक यांनी अथक परिश्रम घेतले.
सदरील सुटला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून लोकअदालतसह क्षेत्रीय कार्यालयात नागरिकानी टॅक्स भरणा करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. सदरील योजनेस मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद पाहता व काही नागरिकांना वैयक्तिक अडचणी मुळे लाभ घेता आला नसल्याने व त्यांची मागणी  असल्याने सदरील योजनेस एक दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय आयुक्त्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी घेतला
आहे.  त्यादृष्टीने सर्व क्षेत्रीय कार्यालये आज दि. २० सप्टेंबर रोजीसुद्धा सुरु राहणार असून , मुदतवाढ दिलेल्या १०० टक्के शास्ती माफी योजना या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन टॅक्स भरुन महानगरपलिकेला सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR