27.1 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeलातूरएकादशीनिमित्त पंढरपूर दर्शनासाठी उद्या मोफत बससेवा

एकादशीनिमित्त पंढरपूर दर्शनासाठी उद्या मोफत बससेवा

लातूर : प्रतिनिधी
श्री सत्संग प्रतिष्ठान लातूरच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर विठ्ठल दर्शनासाठी गरीब भाविकांसाठी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोफत पंढरपूर यात्रेसाठी मोफत बससेवा देण्यात येणार आहे. या यात्रेसाठी उद्या दि. १६ जुलै रोजी मंगळवारी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती बसस्थानक येथून बसेस रवाना होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. शिवाजीराव काळगे हे राहणार असून प्रमुख पाहूणे म्हणून विकास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख, महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचाचे  प्रदेशाध्यक्ष कैलास राठी, अंबड हे उपस्थित राहणार आहेत. प्रतिष्ठानचे हे २४ वे वर्षे असून या योजनेचा लाभ अधिकाधिक वारक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे गोविंद पारिक, सचीव चंदूसेठ लड्डा, रमेश भुतडा, दत्ता लोखंडे,  शाम मुंदडा, लक्ष्मणराव मोरे, गणेश देशमुख, अ‍ॅड. बळवंत जाधव, राजा मणियार, नंदकिशोर लड्डा, संजय लड्डा, संजय लड्डा, राम शिंदे, नाना लोखंडे, मकरंद सावे, निलेश ठक्क र, दिलीप माने, जुगलकिशोर झंवर, द्वारकादास मंत्री, बालाजी बारबोले, प्रकाश कासट, सी.ए. रमेश राठी, प्रकाश पावार, मधुसुदन पारिक, छोटू गडकरी, लक्ष्मीकांत सोमाणी, गोवर्धन भंडारी, अशोक भोसले, संग्राम खंदारे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR