21 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचा-यांची दिवाळी गोड !

एसटी कर्मचा-यांची दिवाळी गोड !

सरकारकडून ३५० कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याला मंजुरी

मुंंबई : प्रतिनिधी
एसटी महामंडळामध्ये काम करणा-या सर्व कर्मचा-यांच्या साठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे. ३५० कोटी रुपयांच्या अर्थ अर्थसाहाय्याला राज्य सरकार कडून मंजुरी देण्यात आली आहे.

त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाला आता काहीसा दिलासा मिळाला असून यामुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सप्टेंबर २०२४ महिन्यासाठी सवलत मूल्याची रक्कम शासनाकडं विनंती केली होती. महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या पत्रकाच्या अनुषंगाने शासनाने या विनंतीला मंजुरी दिली आहे.

राज्य शासनाने एसटी महामंडळासाठी ३५० कोटी रुपयांची निधी मंजुरी करून दिवाळीपूर्वी ही रक्कम वितरित करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे एसटीच्या कर्मचा-यांना वेतन आणि इतर सुविधांसाठी देखील मदत मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त या निधी वितरणासाठी प्राधिकृत करण्यात आले असून त्यांच्या कार्यालयातील लेखाधिकारी यांना ही रक्कम एस टी महामंडळात तातडीने वितरित करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचा-यांना दिवाळीच्या आधी वेतनाची हमी मिळणार आहे त्यामुळे एसटी कर्मचा-यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी येणारी दिवाळी ही आनंदाने साजरी करता येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR