28.5 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeराष्ट्रीयऑटो सेटलमेंटची मर्यादा ५ लाखांवर

ऑटो सेटलमेंटची मर्यादा ५ लाखांवर

ईपीएफओच्या ५ लाख सदस्यांना होणार फायदा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सदस्यांच्या विविध गरजांसाठी सुरू करण्यात आलेली ऑटो सेटलमेंटची मर्यादा वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा १ लाखावरून थेट ५ लाख करण्यात आली आहे. त्याचा फायदा ईपीएफओच्या ७.५ कोटी सदस्यांना होणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या कार्यकारी समितीच्या ११३ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ईपीएफओ मंडळाच्या निर्णयानंतर सदस्य एएसएसीच्या माध्यमातून ५ लाखांपर्यंतचा पीएफ काढू शकतात. ऑटो सेटलमेंट ऑफ अ‍ॅडवान्स क्लेम सर्वात आधी कोरोना काळात २०२० मध्ये सुरु करण्यात आला होता. त्यावेळी त्याची मर्यादा ५० हजार रुपये होती. मे २०२४ मध्ये ईपीएफओने ऑटो सेटलमेंटची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ५० हजार रुपयांची मर्यादा वाढवून १ लाख रुपये करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मर्यादा १ लाखावरुन ५ लाख करण्यात आली.
ईपीएफओने चालू आर्थिक वर्षात ६ मार्च २०२५ पर्यंत २.१६ कोटी रुपयांचे ऑटो क्लेम सेटलमेंट केले. यापूर्वी २०२३-२४ मध्ये ८९.५२ लाख रुपये ऑटो क्लेम सेटलमेंट करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार दावे नाकारण्याचे प्रमाणही गेल्या वर्षीच्या ५० टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर आले आहे. त्याचवेळी पीएफ काढण्यासाठी पडताळणीची औपचारिकता देखील २७ टक्क्यांवरून १८ करण्यात आली आहे.

आता शिक्षण, घर,
लग्नासाठी सेटलमेंट
ईपीएफओने ३ कारणांसाठी नव्याने अग्रीम रकमेचा ऑटो सेटलमेंट सुरु केला. त्यात शिक्षण, लग्न आणि घरासाठी ऑटो मोड सेटलमेंट सुरु केली. त्यापूर्वी ईपीएफओ सदस्यांना केवळ आजारपण किंवा रुग्णालयात दाखल झाल्यावरच पीएफ काढता येत होता. ऑटो-मोड क्लेम फक्त ३ दिवसांत सेटल केला जातो. आता ९५ टक्के क्लेम ऑटो सेटलमेंट होतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR