22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाऑस्ट्रेलिया क्रिकेटवर शोककळा; २३ वर्षीय खेळाडूचा अपघाती मृत्यू

ऑस्ट्रेलिया क्रिकेटवर शोककळा; २३ वर्षीय खेळाडूचा अपघाती मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सामने सुरू आहेत. यामध्ये भारताने पहिला कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. हे सर्व सुरू असतानाच ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून दु:खद बातमी समोर आली आहे. एका २३ वर्षीय नवतरुण खेळाडूच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण ऑस्ट्रेलिया क्रिकेटवर शोककळा पसरली आहे. या खेळाडूने ऑस्ट्रेलियाच्या अनेक दिग्गज खेळाडूंसोबत सामने खेळले आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळला गेला, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी करीत पहिला सामना २९५ धावांनी जिंकला. आता दुसरा कसोटी सामना अ‍ॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे, या सामन्याला अजून बराच वेळ बाकी आहे.

अ‍ॅडलेड कसोटीसाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, या मालिकेदरम्यान संपूर्ण ऑस्ट्रेलियात शोककळा पसरली आहे. कारण एका युवा ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा अपघाती मृत्यू झाला आहे. या खेळाडूच्या मृत्यूने ऑस्ट्रेलिया क्रिकेटवर शोककळा पसरली आहे.

स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या दिग्गजांसोबत खेळलेल्या २३ वर्षांच्या क्रिकेटरचा मृत्यू झाला आहे. अ‍ॅडी डेव्हच्या मृत्यूनंतर संपूर्ण ऑस्ट्रेलियन क्रिकेट हादरले आहे. कारण या खेळाडूचा मृत्यू कसा झाला याचे कारण अद्याप समोर आले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR