24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूरओला व सुका कचऱ्यांचे योग्य वर्गीकरण करण्यासाठी जिल्हयात विशेष मोहीम

ओला व सुका कचऱ्यांचे योग्य वर्गीकरण करण्यासाठी जिल्हयात विशेष मोहीम

सोलापूर-जिल्ह्यातील प्रत्येक घरातील व परिसरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्हयात सोमवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ पर्यंत मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.

जिल्ह्यातील गावस्तरावर दि. ७ ऑगस्ट २०२४ पर्यंत विशेष मोहिम राबविण्याचे निर्दे श राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हयातील प्रत्येक गावात स्वच्छतेचे दाने रंग ओला हिरवा, सुका निळा या नावाने अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत महाराष्ट्र राज्य डिसेंबर २०२४ पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडल करावयाचे आहे. मंडिल झालेल्या गावात दृष्यमह्यान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मंदिल करणे यासाठी विविध विषयाच्या उपक्रमामार्फत गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावात ५ संवादकाची निवड करण्यात येणार असून हेसंवादक प्रत्येकाच्या घरी जावून स्वच्छतेचे संदेश देणार आहेत. यात सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छाग्रही व बचत गटातील महिलांचा समावेश आहे.

ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात व सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात वर्गीकरण करून त्याचे योग्य व्यवस्थापन करावे प्रत्येकाने नियमित शौचालयाचा वापर करणे, शास्रयुक्त पध्दतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, गावात येणाऱ्या छोट्या व्यवसायिक व्यक्तींनी उपलब्ध सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा याबाबत गृहभेटीतून माहिती देण्यात येणार आहे. भेटी दरम्यान शासनाच्या गुगललीक व्दारे त्या कुटुंबाची फोटोसह माहिती राज्य शासनास सादर करणेत येणार आहे. सोलापूर जिल्हातील सर्व गट विकास अधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील गावांमध्ये गृहभेट उपक्रम यशस्वी करणेसाठी ग्रामसेवकामार्फत संवादकांची नेमणूक करुन गृहभेटीचे आयोजन करावे.

असे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सुचित केले आहे. यासाठी तालुक्यास्तरावरील सर्व अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी संनियंत्रण करुन अंमलबजावणी करावी. दर आठवडयाला या अभियानाचा जिल्हास्तरावरुन आढावा घेण्यात येणार आहे. तसेच दिनांक ७ ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येणा-या ओला व सुका कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामस्थानी सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.

ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक कुटूंबासाठी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून संकलन करणेसाठी एक डस्टबीन ग्राम पंचायत स्तरावर १५ वित्त आयोग मधून शासन दरकरारानुसार घेण्याच्या सुचना देणेत आले आहेत. १५ वा वित्त आयोगातील बंधीत निधीतून घ्यावयाचा आहेत. १५ वा वित्त आयोगाचा खर्च खुप कमी आहे. वेळेत याबाबत नियोजन करणे आवश्यक असल्याची माहिती प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR