निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरातील तगरखेडा हालसी सावरी शेळगी हलगरा आदीसह अनेक गावांमध्ये रविवारी सायंकाळी वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला यात शेतक-यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.
तगरखेडा येथील माधवराव थेटे यांच्या सेट नेट हाऊसचे जवळपास सहा लाखाचे नुकसान झाले तर औराद सीमेवरील भीमराव गोंिवदराव मुळे व गंगाबाई सुभाषराव मुळे यांच्या शेतातील तब्बल सहा एकर एकरावरील शेवगा भाजीपाल्याचे मोठे झाडे उंबळून पडले असून यात त्यांचे जवळपास दहा लाखाचे नुकसान झाले आहे. याशिवाय भाजीपाला फळबाग इतर शेतक-यांंचे लाखोचे नुकसान झाले असून संबंधित नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी सांगितले. दरम्यान सोमवारी कृषी विभाग व महसूल विभागाने काही भागातील पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.