कल्याण : प्रतिनिधी
महावितरणकडून अघोषित भारनियमन केले जात असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असते. अशाच प्रकारे महावितरणचा गलथान कारभार कल्याण पूर्वेत पाहण्यस मिळत असून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने कल्याण पूर्वेत महिलांना, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अधिका-यांना विचारणा केली असता अधिकारी देखील उडवाडवीचे उत्तर देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कल्याण पूर्वेत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त झालेत. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परीक्षा काळात विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. महावितरणच्या अधिका-यांना फोन करून देखील अधिकारी, कर्मचारी जुमानत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.