नंदुरबार : नंदुरबार जिल्हा पहिल्यापासून काँगेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यंदा हा गड काँग्रेसने राखला असून काँग्रेस के. सी. पाडवी चे पुत्र अॅड. गोवाल पाडवी यांचा विजय झाला आहे.
भाजपच्या महायुतीची उमेदवार डॉ. हीना गावित आणि काँग्रेस के. सी. पाडवी यांचे पुत्र अॅड. गोवाल पाडवी यांच्यात थेट लढत झाली . नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिक काँग्रेसचा बालेकिल्ला होता. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडत नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर आपला झेंडा फडकवला होता.
यंदा या मतदारसंघात मतदानच्या टक्केवारीत देखील वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा नेमका काँग्रेसला झाला आहे.