22.1 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रकांदा, लसूण राजकीय समीकरणं बिघडवणार?

कांदा, लसूण राजकीय समीकरणं बिघडवणार?

मुंबई : कांदा आणि लसणाच्या तुटवड्याने सध्या मुंबईकरांचे संकट वाढवले आहे. जेवणाला चविष्ट बनवणा-या या दोन महत्त्वाच्या जिन्नसच गायब झाल्याने मुंबईकरांच्या जिभेची चव हरवली आहे. तुटवड्यामुळे कांदा आणि लसणाच्या किमती भडकल्या आहेत. ऐन निवडणुकीत सत्ताधा-यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

कांदा आणि लसणाने ऐन निवडणुकीत सत्ताधा-यांचे टेन्शन वाढवले आहे. कांदा आणि लसणाच्या तुटवड्याने मुंबईकरांच्या जेवणाची चव हरवली आहे. कांदा आणि लसणाच्या पेस्टने रोजच्या जेवणाला रंगत येते. ते रुचकर आणि चविष्ट लागते. पण या दोन महत्त्वाच्या जिन्नसच हरवल्याने मुंबईकरांच्या जेवणाची चव हरवली आहे. कांदा आणि लसणाच्या तुटवड्याने किमती वाढल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांनी दरवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

कांदा ८० रुपये किलोवर तर लसूण ४०० रुपये किलोवर गेला आहे. मुंबईत किरकोळ बाजारात कांदा ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहे. कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवत आहे. पुढील महिनाभर कांद्याचे आणि तीन-चार महिने लसणाचे वाढ चढेच राहणार आहेत.

दिवाळीनिमित्त नाशिक परिसरात कांद्याची खरेदी- विक्री आठवडाभर बंद होती. परिणामी बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतक-यांकडील उन्हाळी कांदा जवळपास संपला आहे. किरकोळ प्रमाणात दोन ते पाच टक्के उन्हाळी कांदा शेतक-­यांकडे शिल्लक आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून पुणे, मुंबईसह राजधानी दिल्लीत दर्जेदार कांद्याचे दर ८० रुपयांवर गेले आहेत. खरीप हंगामातील नुकताच काढलेला, पाण्याचे प्रमाण जास्त असलेला कांदा ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

कांद्याचे भाव भडकणार?
कांद्याचे भाव आणखी महिनाभर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुद्धा कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्याने हा तुटवडा जाणवत आहे. दिवाळीमुळे नाशिक परिसरात कांद्याची खरेदी-विक्री आठवडाभर बंद होती. यंदा पावसाने कांदा मोठ्या प्रमाणात खराब केला आहे. खरीप कांद्याच्या काढणीवर त्याचा परिणाम दिसून आला. उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा झाला आहे. आता या समस्येवर सरकारला लवकरात लवकर तोडगा काढावा लागणार आहे. नाहीतर कांदा हा विधानसभा निवडणुकीतील मुद्दा व्हायला वेळ लागणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR