17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीकार उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

कार उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

अपघात तीन जण गंभीर जखमी, जिंतूर रस्त्यावरील कोक शिवारातील घटना

परभणी / प्रतिनिधी
शिर्डी येथुन दर्शन घेवून परभणीकडे येणा-या एका भरधाव कार रस्त्याच्या कडेला पलटी होवून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवार दि. २ रोजीच्या पहाटे २.३० च्या सुमारास घडली. दरम्यान जखमींवर परभणी येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

परभणी शहरातील दत्तनगर परिसरातील पोलीस कर्मचारी नवनाथ मुंढे हे आपल्या कुटूंबियासह शिर्डीला गेले होते. तेथुन ते गाडी क्रमांक एम.एच. १५ जीआर ९६९७ या कारने परत परभणीकडे निघाले. जिंतूर परभणी रस्त्यावरील कोक गावाजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जावून उलटली. यात कारचा चक्काचुर झाली. यात पोलीस कर्मचारी नवनाथ मुंढे यांच्या पत्नी संगिता नवनाथ मुंढे (४९) यांचा जागीच मृत्यू झाला तर नवनाथ मुंढे (५३), मुलगा शुभम नवनाथ मुंढे (२२), मुलगी भगवती नवनाथ मुंढे हे तिघे जखमी झाले.

दरम्यान घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ जखमींना परभणी येथील देवगिरी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलीस कर्मचारी नवनाथ मुंढे यांची प्रकृती नाजुक असून मुलगा व मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमींवर डॉ. एकनाथ गबाळे, डॉ. अतुल जाधव हे उपचार करीत आहेत.

दरम्यान या प्रकरणी ग्रामीण पोलिीस ठाण्यात भगवती मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास पोलिस निरिक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विक्रम हराळे, बीट जमादार शंकर हाके हे अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR