33.6 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रकुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणे योग्य नाही

कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणे योग्य नाही

शिवराज राक्षेच्या कृत्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे : कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणे योग्य नव्हते असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. न्याय मागताना संयम बाळगणे आवश्यक असल्याचेही अजित पवार म्हणाले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणं पैलवन शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच भोवलं आहे. या दोनही पैलवानांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे.

दरम्यान, अहिल्यानगरमध्ये झालेली ६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही मोठ्या वादामुळे चर्चेत राहिली. गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. पण, शिवराज राक्षेने पंचांच्या निर्णयाला विरोध करत पंचांची कॉलर धरली आणि त्यानंतर थेट लाथ मारली. या घटनेनंतर वाद चांगलाच पेटला आहे. या संपूर्ण घटनेवर राज्याचे उपमुख्यÞमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी ही माहिती दिली. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि शिवीगाळ केली. तर अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत मैदान सोडलं. त्यावेळी त्याने पंचांना शिवीगाळही केली. यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेची एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये या दोनही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR