21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीके. के. एम. महाविद्यालयात उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा : रोमेट जॉन

के. के. एम. महाविद्यालयात उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा : रोमेट जॉन

मानवत : ग्रामीण भागातील के. के. एम. महाविद्यालयाने उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या. संशोधन कार्याला चालना मिळण्यासाठी महाविद्यालयात मोठी क्षमता आहे, असे प्रतिपादन नॅक समितीचे अध्यक्ष रोमेट जॉन यांनी केले.

दि.२८ व २९ रोजी के. के. एम. महाविद्यालयात नॅक समितीने पुनर्मूल्यांकनासाठी भेट दिली. दि.२९ रोजी समारोपाच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष रोमेट जॉन बोलत होते. समितीने नॅक समितीचा गोपनीय अहवाल प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांना सुपूर्द केला. यावेळी नॅक समितीचे सदस्य पुरुषोत्तम मारवानिया, प्राचार्य राजीव खेर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, नॅक समन्वयक डॉ. दुर्गेश रवंदे उपस्थित होते.

पुढे बोलताना जॉन म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणात संशोधन कार्याला विशेष महत्व आहे. त्यामुळे महाविद्यालयाने संशोधन कार्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण होणे आवश्यक आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सुविधा दिल्या आहेत असे सांगितले.
या समितीने दोन दिवस महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, भौतिक सुविधा, क्रीडा विभाग, ग्रंथालय, वनस्पतीशास्त्र उद्यान तसेच प्रशासकीय कामकाज, अंतर्गत गुणवत्ता कक्ष, संशोधन कार्य यांचा आढावा घेतला.

कार्यक्रमास पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रूवार, सचिव बालकिशन चांडक, सहसचिव विजयकुमार दलाल, संचालक दिलीप हिबारे, संजय लड्डा यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांनी तर सूत्रसंचालन डॉ.कैलास बोरुडे यांनी केले. आभार डॉ. दुर्गेश रवंदे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR