20.8 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमुख्य बातम्याकेक, पेस्ट्री खाल्ल्याने होतो कॅन्सर; सरकारी अहवालातून गंभीर इशारा

केक, पेस्ट्री खाल्ल्याने होतो कॅन्सर; सरकारी अहवालातून गंभीर इशारा

मुंबई : वृत्तसंस्था
वाढदिवसच नाही तर कोणत्याही सेलिब्रेशनसाठी किंवा लहर आली म्हणून केक, पेस्ट्री खाणा-या मंडळीचं प्रमाण मोठं आहे. बेकरीमध्ये विकण्यात येणा-या काही केकमध्ये कॅन्सर होण्यास कारणीभूत असलेले अंश आढळले आहेत, असा धक्कादायक अहवाल कर्नाटक सरकारच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागानं दिला आहे.

कर्नाटक सरकारच्या याच विभागानं दोन महिन्यांपपूर्वी रस्त्यावर विक्री केले जाणारे कबाब, मंचूरियन आणि पाणी पुरीमध्ये कार्सिनोजेन्स हे कॅन्सर निर्मिती करणारे अंश सापडल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा कर्नाटक सरकारनं गंभीर इशारा दिला आहे.

कर्नाटक सरकारच्या या विभागानं ऑगस्ट महिन्यात शहरातील वेगवेगळ्या बेकरीमधील २३५ केकच्या नमुन्यांची पाहणी केली. त्यामधील २२३ केक सुरक्षित आढलले. पण, १२ केकमध्ये धोकादायक कृत्रीम रंग आढळले.

रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट या लोकप्रिय केकमध्ये हे धोकादायक केमिकल्स अनेकदा वापरले जातात. त्यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कर्नाटक सरकारच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागानं संबंधित बेकरींना सुरक्षा मानकांचं पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR