22.5 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमुख्य बातम्याकॉँग्रेस दिल्ली विधानसभा आता स्वबळावर लढविणार

कॉँग्रेस दिल्ली विधानसभा आता स्वबळावर लढविणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभेची निवडणूक काँग्रेस पूर्ण ताकदीने लढताना दिसत आहे. या निवडणुकीत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे तिन्ही पक्ष विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा भाग आहेत.

अरविंद केजरीवाल कसे देशविरोधी आहेत, हे पत्रकार परिषदेत सांगणार असल्याचे काँग्रेसचे अजय माकन यांनी सांगितले होते. मात्र, राहुल गांधींनी अजय माकन यांना फोन करून पत्रकार परिषद अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. राहुल गांधी यांनी सहकारी पक्षांचे म्हणणे ऐकले. मात्र, त्यानंतरही ‘इंडिया’च्या सहका-यांनी काँग्रेसऐवजी ‘आप’ला दिल्ली निवडणुकीसाठी पाठिंबा दर्शविला, तर काँग्रेसचे म्हणणे आहे की, इंडिया आघाडीचे उद्दिष्ट २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे होते, जे पूर्ण झाले आहे.

केंद्रासोबत काम करू : ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार केंद्राशी लढणार नाही, तर जम्मू-काश्मीरमधील समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करेल, असे मत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे.
‘इंडिया’मधील एकतेच्या चिंतेबद्दल ते म्हणाले की, ही आघाडी केवळ निवडणूक लढवण्यासाठी नाही, तर ती भारताला मजबूत करण्यासाठी आणि द्वेष दूर करण्यासाठी आहे. नॅशनल कॉन्फरन्सचा भाजपशी काहीही संबंध नाही. मात्र, स्थानिक समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारांना सहकार्य करण्याची जबाबदारी केंद्राची आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR