लातूर : प्रतिनिधी
रात्रीच्या वेळी मोटारसायकलवर फिरून शटर उचकाटून चोरी करणा-या टोळीतील दोघांना गांधी चौक पोलिसांचे पथकाने कोबिंग ऑपरेशन दरम्यान पकडले असून त्याचे साथीदारासह काही घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून तीन तलवारीही जप्त करण्यात आल्या आहेत.
लातूर शहरात काही दुकानाचे शटर उचकाटून चो-या झाल्याच्या घटना घडल्या होत्या. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलिसांनी शहरातील ६० फूट रोड परिसरात एक जण तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच त्यास ताब्यात घेतले. तेंव्हा गौस मुस्तफा सय्यद रा. बौद्धनगर लातूर याने आसीफ जावेद पठाण रा. आनंद नगर लातूर व ईतराच्या मदतीने रात्रीच्या वेळी मोटारसायकलवर फिरून घरफोड्या केल्याचे कबूल केले. गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वातील पथकाने वरील दोघास अटक करून त्यांचेकडून तीन तलवारीही जप्त केल्या आहेत. त्यांच्याकडून आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. वरील चोरट्याविरूद्ध शस्त्र अधिनियमानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे गांधीचौक डी.बी. पथकातील अधिकारी व अंमलदारचे पथक तयार करून सदरची कार्यवाही वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे गांधीचौक डी. बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक अक्रम मोमीन, पोलीस अमलदर राजेंद्र टेकाळे, दामोदर मुळे, राम गवारे, दतात्रय शिंदे, रणविर देशमुख, शिवाजी पाटील, संतोष गिरी यांनी केलेली आहे.सदर गुन्हेगार हे रेकॉर्डवरील सराइत गुन्हेगार असून त्यांचेकडून इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांना अटक करण्यात येणार आहे.